आतंकवादाच्या विरोधात सर्वांनी एकत्रित लढणे आवश्यक ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई – २६/११ या दिवशी मुंबईवर झालेले आतंकवादी आक्रमण कुणीही विसरू शकत नाही. हा आमच्यासाठी ‘काळा दिवस’ होता. याच ठिकाणी आतंकवादाच्या विरोधात संयुक्त राष्ट्रांची सुरक्षा परिषद होत आहे. आतंकवादाच्या विरोधात सर्वांनी एकत्र लढणे आवश्यक आहे. देशाचे पंतप्रधान त्यासाठी सक्षम आहेत. आम्ही नेहमीच त्याच्यासमवेत आहोत, असे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. मुंबईमध्ये आतंकवादाचा सामना करण्यासाठी धोरण आखण्यासाठी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक होत आहे. याविषयी पत्रकारांनी विचारले असता मुख्यमंत्र्यांनी वरील मनोगत व्यक्त केले.