पाकमध्ये १० वर्षांच्या हिंदु मुलीचे अपहरण करून ८० वर्षांच्या मुसलमानाशी लावून दिले लग्न !

कराची (पाकिस्तान) – पाकच्या सिंध प्रांतामध्ये शेख भिरकियो भागातील एका १० वर्षांच्या एका हिंदु मुलीचे अपहरण करून तिचे ८० वर्षांच्या वृद्ध मुसलमानाशी विवाह करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. ही घटना २२ ऑक्टोबरची आहे. ती अल्पवयीन मुलगी येथील कपडे धुण्याच्या ठिकाणी असतांना तेथून तिचे अपहरण करण्यात आले. जमीनदार मुल्ला रशीद याच्या गुंडांनी हे अपहण केले. त्यानंतर या मुलीचे धर्मांतर करण्यात आले आणि नंतर मुल्ला रशीद याच्याशी विवाह लावून देण्यात आला.

सिंधमध्येच २४ ऑक्टोबर या दिवशी शांती मेघवार नावाच्या एका विवाहित हिंदु महिलेचे अपहरण करण्यात आले होते. तिच्या घरातूनच हे अपहरण करण्यात आले. त्यानंतर तिचे धर्मांतर करून मंजूर शेख याच्याशी लग्न लावून देण्यात आले.

संपादकीय भूमिका

पाकमध्ये धर्मांध मुसलमान थेट हिंदु मुली, तरुणी आणि महिला यांचे थेट अपहरण करून त्यांच्याशी विवाह करतात, तर भारतात हिंदु तरुणींना लव्ह जिहादच्या जाळ्यात ओढून विवाह करून तिची फसवणूक करतात !