(म्हणे) ‘औरंगजेब वाईट बादशाह नव्हते, त्यांचा चुकीचा इतिहास दाखवला जात आहे !’

क्रूर औरंगजेब हा ‘वाईट बादशाह नव्हता’, असे औरंगजेबी मानसिकताच जोपासणार्‍या अबू आझमी यांना वाटणे साहजिक आहे !

बरेली (उत्तरप्रदेश) येथे मुसलमानांच्या वस्तीमधून कावड यात्रेकरूंना जाण्यापासून रोखले !

उत्तरप्रदेश भारतात आहे कि पाकिस्तानात ? उत्तरप्रदेशात भाजपचे सरकार असतांनाही धर्मांधांचा हिंदूंच्या यात्रेला विरोध करण्याचे धाडस होतेच कसे ? अशा घटना कायमच्या रोखण्यासाठी हिंदु राष्ट्राला पर्याय नाही !

बलात्कार्‍यांना फाशीची शिक्षा देण्याचा कायदा झाल्यापासून पीडितांची हत्या करण्याच्या घटनांत वाढ !

कुकृत्य केलेल्या पुरुषाला वाटते की, जर पीडितेला जिवंत ठेवले, तर ती त्याच्या स्वतःविरुद्धची (पुरुषाविरुद्धची) साक्षीदार बनेल. त्यामुळे तो तिला बलात्कार केल्यानंतर ठार मारतो. हे धोकादायक आहे ! – राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत

(म्हणे) ‘भारत आणि पाकिस्तान यांनी चर्चेद्वारे काश्मीर प्रश्‍न सोडवावा !’ – चीन

भारताच्या अंतर्गत प्रश्‍नांमध्ये नाक खुपसण्याऐवजी चीनने त्याच्या देशात भेडसावणार्‍या समस्या सोडवण्याकडे लक्ष द्यावे ! भारतानेही आता चीनला शाब्दिक समज देण्यापेक्षा त्याला समजेल अशा भाषेत उत्तर देणे अपेक्षित आहे !

दोन्ही देशांत चर्चा होईपर्यंत चीनने त्याची गुप्तहेर नौका श्रीलंकेत पाठवू नये !

सध्या ही नौका तैवानजवळील समुद्रात आहे. या नौकेवर अत्याधुनिक उपकरणे बसवण्यात आली आहेत. त्यामुळे ही नौका श्रीलंकेत पोचली, तर ती तेथून भारतातील काही ठिकाणांची टेहाळणी करून संवेदनशील माहिती गोळा करू शकते.

मला मुसलमानबहुल परिसरातून पलायन करण्यास भाग पाडले जात आहे ! – पीडित मनीष शुक्ला यांची पोलिसांत तक्रार

हिंदूबहुल भारतात अल्पसंख्यांकांना घर नाकारल्यावर आकाश-पाताळ एक करणारे काँग्रेसवाले, पुरोगामी, साम्यवादी, निधर्मी, हिंदुद्वेषी प्रसारमाध्यमे आदी आता गप्प का ?

उत्तरप्रदेशात मोहरमच्या निमित्ताने उभारलेले प्रवेशद्वार हटवण्यासाठी आमदाराच्या पित्याचे आंदोलन

उत्तरप्रदेशातील प्रतापगढ जिल्ह्यातील शेखपूर गावात मोहरमच्या निमित्ताने ‘मस्जिदनुमा गेट’ या नावाने प्रवेशद्वार उभारण्यात आले आहे. हे प्रवेशद्वार हटवण्यात यावे, अशी मागणी कुंडा मतरदारसंघाचे जनसत्ता दलाचे आमदार राघुराज प्रताप सिंह यांचे वडील उदय प्रताप सिंह यांनी केली.

भाजपच्या खासदारांनी त्यांच्या पत्नींना विचारावे की, त्या स्वयंपाकघर कसे चालवतात ?

महागाईच्या विषयावरूनच भाजप सत्तेत आला; मात्र आता ८ वर्षांच्या त्यांच्या सत्ताकाळात महागाईने उच्चांक गाठला आहे. जीवनावश्यक वस्तूंचे दर दुपटीने वाढले आहेत. त्यामुळे गरिबांचे हाल होत आहेत.

अल्पसंख्य हिंदु, ख्रिस्ती आणि शीख धर्मीय बंदीवानांनी त्यांचा धर्मग्रंथ पाठ केल्यास त्यांच्या शिक्षेत ३ ते ६ मासांची सूट मिळेल !

भारतात हिंदु बंदीवानांना साधना शिकवून त्यांच्याकडून धर्माचरण करून घेणे आवश्यक आहे ! असे केल्याने त्यांच्यातील गुन्हेगारी वृत्तीमध्ये पालट होऊन त्यांच्यात सुधारणा होऊ शकते !

कर्नाटकमध्ये चुकीच्या व्यक्तीला अटक केल्यामुळे तिला ५ लाख रुपये हानीभरपाई देण्याचा उच्च न्यायालयाचा आदेश

ही रक्कम संबंधित पोलीस अधिकार्‍यांकडून वसूल केली पाहिजे ! देशात अशा पद्धतीने घडणार्‍या किंवा अटकेनंतर व्यक्ती निर्दोष सुटल्यावर तिला हानीभरपाई देण्याचा कायदाही करणे आवश्यक आहे !