कर्नाटकमध्ये चुकीच्या व्यक्तीला अटक केल्यामुळे तिला ५ लाख रुपये हानीभरपाई देण्याचा उच्च न्यायालयाचा आदेश

बेंगळुरू (कर्नाटक) – येथे ५६ वर्षीय निंगाराजू एन्. या व्यक्तीला चुकीने अटक केल्याच्या प्रकरणी कर्नाटक उच्च न्यायालयाने त्यांना ५ लाख रुपये हानीभरपारई देण्याचा आदेश राज्य सरकारला दिला. वर्ष २०११ मध्ये ज्या राजू एन्.जी.एन्. या व्यक्तीच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला होता, ती ही व्यक्ती नव्हती.

न्यायालयाने म्हटले की, ज्याच्या विरोधात अटक वॉरंट काढण्यात आले आहे, ती हीच व्यक्ती आहे ना, याची निश्‍चिती केल्याविना तिला अटक करणे आश्‍चर्यकारक आहे. अशा निपराध व्यक्तीची ओळख न पटवताच तिला अटक करण्यात आली.

संपादकीय भूमिका

  • ही रक्कम संबंधित पोलीस अधिकार्‍यांकडून वसूल केली पाहिजे ! देशात अशा पद्धतीने घडणार्‍या किंवा अटकेनंतर व्यक्ती निर्दोष सुटल्यावर तिला हानीभरपाई देण्याचा कायदाही करणे आवश्यक आहे !
  • या घटनेवरून ‘पोलीस कसे काम करतात’, हे लक्षात येते ! अशांमुळे जनतेचा आता पोलिसांवरील विश्‍वास उडाला आहे !