मला मुसलमानबहुल परिसरातून पलायन करण्यास भाग पाडले जात आहे ! – पीडित मनीष शुक्ला यांची पोलिसांत तक्रार

घराबाहेर उभी केलेल्या चारचाकी वाहनाच्या काचा फोडल्या, घरावर दगडफेक !

प्रतिकात्मक छायाचित्र

कानपूर (उत्तरप्रदेश) – येथील रावतपूर गावातील रहमतनगर या मुसलमानबहुल भागातून मला पलायन करण्यास भाग पाडले जात आहे, असा आरोप येथील पीडित मनीष शुक्ला यांनी केला. याविषयी शुक्ला यांनी रावतपूर पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे. या तक्रारीत म्हटले आहे की, माझ्या घराबाहेर उभ्या असलेल्या माझ्या चारचाकी वाहनाच्या काचा फोडणे, घरावर दगडफेक करणे आदी माध्यमांतून माझा छळ केला जात आहे. आरोपींच्या विरोधात कारवाई न केल्यास मला या परिसरातून घरदार सोडून पलायन करावे लागेल.

यावर पोलिसांनी आरोपींच्या विरोधात गुन्हा नोंदवला असून अन्वेषण चालू करण्यात आले आहे. ‘या प्रकरणातील दोषींना अटक करून त्यांना कारागृहात पाठवले जाईल’, असे आश्‍वासन कल्याणपूरचे पोलीस उपायुक्त दिनेश शुक्ला यांनी दिले.

संपादकीय भूमिका

  • मुसलमानबहुल भागात हिंदू असुरक्षित ! हिंदूंवर अशी स्थिती ओढवायला कानपूर भारतात आहे कि पाकिस्तानात !
  • हिंदूबहुल भारतात अल्पसंख्यांकांना घर नाकारल्यावर आकाश-पाताळ एक करणारे काँग्रेसवाले, पुरोगामी, साम्यवादी, निधर्मी, हिंदुद्वेषी प्रसारमाध्यमे आदी आता गप्प का ?