राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचा दावा
नवी देहली – देहलीमध्ये काही वर्षांपूर्वी झालेल्या निर्भया सामूहिक बलात्काराच्या प्रकरणानंतर आरोपींना फाशी देण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार कायद्यात पालटही करण्यात आला; मात्र त्यामुळे अशा घटनांमध्ये पीडित महिलांच्या हत्या करण्याच्या प्रकरणांत वाढ झाली आहे, असे विधान राजस्थानमधील काँग्रेस सरकारचे मुख्यमंत्री अशोक गेहलोक यांनी येथे प्रसारमाध्यमांशी बोलतांना केले.
रेप में फांसी की सजा के प्रावधान पर अशोक गहलोत का बेतुका बयान… यह बोल गए राजस्थान के सीएम…#AshokGehlot #rajasthancm @ashokgehlot51 @PMOIndia @PoliceRajasthan https://t.co/FSitjtItQU
— Sudarshan News (@SudarshanNewsTV) August 6, 2022
गेहलोत पुढे म्हणाले की, कुकृत्य केलेल्या पुरुषाला वाटते की, जर पीडितेला जिवंत ठेवले, तर ती त्याच्या स्वतःविरुद्धची (पुरुषाविरुद्धची) साक्षीदार बनेल. त्यामुळे तो तिला बलात्कार केल्यानंतर ठार मारतो. देशभरातून या प्रकरणांत जी काही माहिती मिळाली आहे, त्यातून असेच दिसून येत आहे. हे धोकादायक आहे.