बरेली (उत्तरप्रदेश) येथे मुसलमानांच्या वस्तीमधून कावड यात्रेकरूंना जाण्यापासून रोखले !

कावड यात्रेकरूंना जाण्यापासून रोखले !

बरेली (उत्तरप्रदेश) – कावड यात्रेकरू येथील दुनका परिसरातील मुसलमानबहुल भागातून जातांना त्यांना मुसलमानांकडून रोखण्यात आले. त्यांना मार्ग पालटण्यास सांगण्यात आले. ते अंतर अधिक आहे, तसेच प्रशासनानेही कावड यात्रेकरूंना दुसर्‍या मार्गाने जाण्याचा सल्ला दिला; मात्र कावड यात्रेकरू त्यासाठी सिद्ध नव्हते. या घटनेमुळे येथे पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

वर्ष २०१४ मध्येही अशा प्रकारचा वाद झाला होता. त्या वेळी प्रशासनाने दोन्ही धर्मियांसमवेत बैठक घेऊन मार्ग निश्‍चित केला होता. त्याच मार्गाने कावड यात्रेकरू आता जात होते; मात्र तरीही त्यांना रोखण्यात आले. राज्यात काही ठिकाणी मुसलमानांनी दबाव आणून कावड यात्रेकरूंचा मार्ग पालटण्यास भाग पाडले आहे. काही दिवसांपूर्वी बरेलीच्याच परगंवा गावात मुसलमान महिलांनी कावड यात्रेकरूंना विरोध करत त्यांना मारहाण केली होती, तसेच त्यांच्यावर घाणेरडे पाणीही फेकले होते.

संपादकीय भूमिका

उत्तरप्रदेश भारतात आहे कि पाकिस्तानात ? उत्तरप्रदेशात भाजपचे सरकार असतांनाही धर्मांधांचा हिंदूंच्या यात्रेला विरोध करण्याचे धाडस होतेच कसे ? अशा घटना कायमच्या रोखण्यासाठी हिंदु राष्ट्राला पर्याय नाही !