उत्तरप्रदेशात मोहरमच्या निमित्ताने उभारलेले प्रवेशद्वार हटवण्यासाठी आमदाराच्या पित्याचे आंदोलन

धरणे आंदोलन करताना उदय प्रताप सिंह (उजवीकडे)

लक्ष्मणपुरी – उत्तरप्रदेशातील प्रतापगढ जिल्ह्यातील शेखपूर गावात मोहरमच्या निमित्ताने ‘मस्जिदनुमा गेट’ या नावाने प्रवेशद्वार उभारण्यात आले आहे. हे प्रवेशद्वार हटवण्यात यावे, अशी मागणी कुंडा मतरदारसंघाचे जनसत्ता दलाचे आमदार राघुराज प्रताप सिंह यांचे वडील उदय प्रताप सिंह यांनी केली. हे प्रवेशद्वार हटवण्यासाठी त्यांनी ‘धरणे आंदोलन’ करत ‘जोपर्यंत हे प्रवेशद्वार हटवण्यात येत नाही, तोपर्यंत आंदोलन चालू राहील’, अशी चेतावणी त्यांनी दिली. गावात तणाव निर्माण होऊ नये, यासाठी सिंह यांना स्थानबद्ध करण्यात आले आहे.

सौजन्य :  News7 India | News Around the World

१. गावात शांतता राखण्यासाठी प्रशासनाने कलम १४४ (जमावबंदी) लागू केले आहे.

२. सिंह यांच्या आंदोलनाला आणि मागणीला ‘अखिल भारतीय हिंदु महासभे’ने पाठिंबा दिला आहे. महासभेचे राष्ट्रीय प्रवक्ते शिशिर चतुर्वेदी म्हणाले, ‘‘प्रशासन मुसलमानांचे तुष्टीकरण करण्यात मग्न आहे. प्रशासनाने हे न थांबवल्यास अखिल भारतीय हिंदु महासभा रस्त्यावर उतरून आंदोलन करील.’’

३. उदय प्रताप सिंह म्हणाले, ‘‘हिंदूंवर अन्य धर्म थोपवले जात आहेत. याविषयी प्रशासनालाही माहिती देण्यात आली होती; मात्र तरीही संबंधितांवर कारवाई करण्यात आलेली नाही.’’