पुणे येथे २५ जूनला नरवीर तानाजी मालुसरे यांच्या शौर्यगाथेवर आधारित चित्रप्रदर्शनाचे आयोजन ! 

२५ जूनला फ्रांसुआ गोतिए यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. हे विनामूल्य प्रदर्शन सर्वांसाठी खुले असणार आहे, अशी माहिती विंग कमांडर शशिकांत ओक (निवृत्त) यांनी पत्रकार परिषदेत दिली.

विद्यार्थी आणि तरुण यांची अडचण लक्षात घेऊन कोरोनाविषयक खटले मागे घेण्याचा निर्णय !

कोरोना महामारीच्या काळातील प्रतिबंधात्मक आदेशांचे उल्लंघन केल्यामुळे नोंद केलेले खटले मागे घेण्यासाठी क्षेत्रीय समित्यांना कार्यवाही करण्यासाठी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.

धाराशिव येथे धर्मांध कनिष्ठ लिपिकाने महिला कर्मचाऱ्याकडून लाच घेतांना तिचा केला विनयभंग !

कार्यालयातील कनिष्ठ लिपिक एजाज शेख याने वरिष्ठ लिपिक देसाई यांना सांगून स्थानांतर करून देण्यासाठी १० सहस्र रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. त्यानंतर शेख याने महिला कर्मचाऱ्याकडून १० सहस्र रुपयांची लाच पंचांसमक्ष स्वीकारली.

सातारा तहसील कार्यालयात वाहनतळ व्यवस्थेची मागणी !

वाढत्या लोकसंख्येच्या मानाने सध्याचे तहसील कार्यालय अपुरे पडत आहे. वाहतूककोंडी टाळण्यासाठी वाहनतळाची साधी व्यवस्थाही न करणारे सातारा प्रशासन अकार्यक्षम !

उपमुख्यमंत्री अजित पवार शिवसेनेप्रमाणे काँग्रेसच्या आमदारांनाही त्रास द्यायचे ! – नाना पटोले, काँग्रेस

अजित पवार हे आम्हाला निधी देत नाहीत, त्रास देतात, अशा प्रकारच्या तक्रारी शिवसेनेच्या आमदारांकडून करण्यात आल्या, तशाच तक्रारी काँग्रेसच्या आमदारांनीही माझ्याकडे केल्या होत्या.

नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणासाठी आज सिडकोला घेराव !

‘नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे’, या मागणीसाठी मुंबई, नवी मुंबई, रायगड, ठाणे, पालघर आदी जिल्ह्यांतील प्रकल्पग्रस्त भूमीपुत्रांनी मागील वर्षी साखळी आंदोलन केले होते.

तुळजापूर शहरातील बसस्थानकाची दुरवस्था !

साडेतीन शक्तीपीठातील एक पूर्ण पीठ असलेल्या श्री तुळजाभवानीदेवीच्या शहरातील जुन्या बसस्थानकात पहिल्याच पावसात पाण्याचे डबके झाले आहे.

राष्ट्रपतीपदाची निवडणूक !

शासन किंवा प्रशासन यात निःस्पृह आणि निःस्वार्थ लोकांची वानवा आहे. हल्ली एखादे पद मिळाल्यास आणि त्या अनुषंगाने आलेले अधिकार मिळाल्यास त्याचा नेहमीच जनतेच्या हितासाठी वापर होतो, असे म्हणणे धाडसाचे ठरेल. या पार्श्वभूमीवर मुर्मू यांनी केलेल्या स्वच्छतेच्या कृतीमुळे त्यांच्याविषयी लोकांच्या अपेक्षा नक्कीच वाढल्या आहेत !

शारदापीठ भारताने कह्यात घ्यावे !

हिंदूंच्या गौरवशाली इतिहासाची ही चिन्हे कशी पुसली जातील, यासाठीच पाक प्रयत्न करेल. हे लक्षात घेऊन आता भारतानेच शारदापीठाच्या जीर्णाेद्धारासाठी प्रयत्न करावेत. त्यासाठी आक्रमक पावले उचलून हा भागच कह्यात घेणे आवश्यक आहे !

मुंबईत ८ दिवसांत पाणीकपातीचा निर्णय !

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या उर्ध्व वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी या ७ धरणांतील पाणीसाठा वेगाने आटत आहे.