पंढरपूर-निजामाबाद पॅसेंजरसह २८ रेल्वेगाड्या ८ दिवसांसाठी रहित !
भुसावळ विभागाच्या मनमाड-अंकाई किल्ला रेल्वे स्थानकादरम्यान ‘यार्ड रिमोल्डिंग’ आणि दुहेरीकरण रेल्वे ट्रॅक जोडण्यासाठी ‘नॉन इंटरलॉकिंग’चे काम २३ जून ते ३० जून या कालावधीत होणार आहे. यासाठी ८ दिवसांचा ‘ब्लॉक’ (बंद) घेण्यात आला आहे.