धाराशिव येथे धर्मांध कनिष्ठ लिपिकाने महिला कर्मचाऱ्याकडून लाच घेतांना तिचा केला विनयभंग !

धर्मांध कनिष्ठ लिपिकावर गुन्हा नोंद

धाराशिव – पोलीस अधीक्षक कार्यालयातील महिला कर्मचाऱ्याकडून स्थानांतर करण्यासाठी कनिष्ठ लिपिक एजाज अजीम शेख याने १० सहस्र रुपयांची लाच स्वीकारली, तसेच लाच स्वीकारतांना महिलेचा विनयभंग केला. या प्रकरणी एजाज शेख याच्यावर गुन्हा नोंद करून त्याला कह्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई धाराशिव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली. (धर्मांधांची मनोवृत्ती ! अशा भ्रष्ट आणि वासनांध लिपिकांवर कठोर कारवाई होणे अपेक्षित ! – संपादक) पोलीस अधीक्षक कार्यालयातील महिला कर्मचाऱ्याने स्थानांतरासाठी अर्ज केला होता. कार्यालयातील कनिष्ठ लिपिक एजाज शेख याने वरिष्ठ लिपिक देसाई यांना सांगून स्थानांतर करून देण्यासाठी १० सहस्र रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. त्यानंतर शेख याने महिला कर्मचाऱ्याकडून १० सहस्र रुपयांची लाच पंचांसमक्ष स्वीकारली.