तुळजापूर (जिल्हा धाराशिव) – साडेतीन शक्तीपीठातील एक पूर्ण पीठ असलेल्या श्री तुळजाभवानीदेवीच्या शहरातील जुन्या बसस्थानकात पहिल्याच पावसात पाण्याचे डबके झाले आहे. तुळजापूर येथील जुन्या बसस्थानकामध्ये राज्यभरातून मोठ्या संख्येने भाविक येतात, तसेच राज्यभरातून धावणाऱ्या शेकडो बस या स्थानकातून ये-जा करतात. २२ जून या दिवशी झालेल्या अल्पशा पावसाने बसस्थानकामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साठले होते. (विभागीय कार्यालय आणि तुळजापूर विकास प्राधिकरण यांनी बसस्थानकात येणाऱ्या भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी उपाययोजना करणे अपेक्षित ! – संपादक)