उपमुख्यमंत्री अजित पवार शिवसेनेप्रमाणे काँग्रेसच्या आमदारांनाही त्रास द्यायचे ! – नाना पटोले, काँग्रेस

नाना पटोले, काँग्रेस

मुंबई – अजित पवार हे आम्हाला निधी देत नाहीत, त्रास देतात, अशा प्रकारच्या तक्रारी शिवसेनेच्या आमदारांकडून करण्यात आल्या, तशाच तक्रारी काँग्रेसच्या आमदारांनीही माझ्याकडे केल्या होत्या. त्यानंतर मी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार यांना भेटून त्यासंबंधीची भूमिका स्पष्ट केली होती, अशी माहिती नाना पटोले यांनी २३ जूनला एका वृत्तवाहिनीशी बोलतांना दिली. राज्यातील राजकीय घडामोडीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक झाली. त्यात ते बोलत होते.

ते म्हणाले, ‘‘जर शिवसेनेने काही निर्णय घेतला, तर आम्ही सिद्ध आहेत. जर काही वेगळा विचार झाला, तर आम्ही विरोधी पक्षात बसायला सिद्ध आहोत.’’