VIDEO : जुने गोवे येथील ५०० वर्षे जुने चर्च संरक्षित; परंतु १२ व्या शतकातील खांबाकडे दुर्लक्ष ! – श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

या खांबाचे चांगल्या प्रकारे संवर्धन व्हावे, त्या ठिकाणी माहिती देणारा फलक लिहून पुढील पिढीला हा इतिहास कळावा, यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

VIDEO : देश, भाषा, संस्कृती आणि हिंदु धर्म यांच्याशी एकनिष्ठ राहून धर्मकार्य केल्यास हिंदु राष्ट्र येण्यास वेळ लागणार नाही ! – जगद्गुरु रामराजेश्वर माऊली सरकारजी महाराज, रुक्मिणी वल्लभ पीठ, कौंडण्यपूर, अमरावती, महाराष्ट्र

दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात राष्ट्र आणि धर्म यांच्यासाठी कृतीशील होण्याचे हिंदूंना आवाहन !

हिंदु राष्ट्रातील राजकारणी कसे असतील ?

‘हिंदु राष्ट्रात ‘स्वतःकडे सत्ता असावी’, अशा विचाराचे स्वार्थी आणि अहंभावी राजकारणी नसतील, तर ‘मानवजातीने साधना करून ईश्वरप्राप्ती करावी’, या विचाराचे धर्मसेवक आणि राष्ट्रसेवक असतील !’

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी पुढाकार घेऊन कार्य करा !

हिंदु राष्ट्र अधिवेशनाच्या समारोपीय भाषणात सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांचे आवाहन !

अन्नधान्याची नासाडी टाळा !

मुंबईत ६९ लाख किलो खाद्यपदार्थ प्रतिदिन कचऱ्यात फेकले जातात.नासाडी अशीच होत राहिली, तर वर्ष २०५० पर्यंत सद्यःस्थितीपेक्षा तिप्पट लोकांवर उपासमारीची वेळ ओढावेल !

‘अग्नीपथ’च्या विरोधातील षड्यंत्र !

राष्ट्रीय लोकदलाच्या वतीने संपूर्ण जुलै मासात उत्तरप्रदेशातील मुसलमानबहुल शहरांत अग्नीपथच्या विरोधात आंदोलनासाठी बैठका घेण्यात येणार आहेत. त्या होण्यापूर्वी सरकारने या देशद्रोही शक्तींचा बंदोबस्त केला पाहिजे !

पाकप्रेमी खलिस्तानी आता गप्प का ?

काबूल (अफगाणिस्तान) येथील कर्ता परवान या गुरुद्वारावर इस्लामिक स्टेटच्या आतंकवाद्यांनी आक्रमण केले. यात २ अफगाण नागरिकांचा मृत्यू, तर ३ तालिबानी सैनिक घायाळ झाले.

भारतातील सर्वाधिक युवावर्गाची जडणघडण, हे राष्ट्रीय दायित्वच !

प्रस्थापित शिक्षणव्यवस्थेत मोठ्या प्रमाणात पालट करून त्यात आदर्श आचार आणि विचार शिकवणारे धर्मशिक्षण अंतर्भूत करणे, ही आवश्यकता आहे. ते कार्य शासनकर्त्यांनी मनावर घेतल्यास केवळ शिक्षणव्यवस्थाच नव्हे, तर देशाचाच कायापालट होणार आहे.

भारतातील युवकांची भयावह दु:स्थिती !

आजच्या बहुसंख्य युवकांसमोर विशिष्ट असे कोणतेच ध्येय किंवा आदर्श नाही. शीड नसलेले जहाज जसे वाऱ्यासमवेत सागरात कुठेही भरकटते, तसाच आजचा युवक आहे. युवकांमधील विकृती वाढत आहेत. ‘हे वेळीच रोखले नाही, तर विकासापेक्षा विनाशच होणार आहे’, हे सांगायला कुणा भविष्यवेत्त्याची आवश्यकता नाही !