शाळेमध्ये शिक्षकांच्या भ्रमणभाष वापरावर निर्बंध !

जिल्ह्यातील प्राथमिक शाळांमधील मुलांची गुणवत्ता वाढावी, कोरोना संसर्गाच्या काळातील मुलांची शैक्षणिक हानी भरून काढावी यांसाठी जिल्ह्यात विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत.

जळगाव येथे महिलेचा विनयभंग करणाऱ्या ‘महावितरण’च्या दोघांविरोधात गुन्हा नोंद !

येथील महावितरण आस्थापनात कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याकडे शरीरसुखाची मागणी करत तिचा विनयभंग करण्यात आला. या प्रकरणी पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

लाचखोर वस्तू आणि सेवा कर निरीक्षक कह्यात !

गोठवलेले बँक (अधिकोषातील) खाते पुन्हा चालू करून ‘क्लिअरन्स’ प्रमाणपत्र देण्यासाठी २ सहस्र रुपयांची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने वस्तू आणि सेवा कर कार्यालयातील निरीक्षकाला सापळा रचून पकडले.

पिंपरी (पुणे) आणि आकुर्डी येथील साधन केंद्रातील पालकांच्या गृहभेटी घेण्याचे शिक्षकांना आदेश !

महापालिका शिक्षण विभागाने यू-ट्यूबच्या माध्यमातून पिंपरी आणि आकुर्डी शहर साधन केंद्रातील महापालिकेच्या मराठी, हिंदी, उर्दू आणि इंग्रजी माध्यमांच्या मुख्याध्यापक अन् शिक्षक यांना शाळापूर्व सिद्धतेसाठी मार्गदर्शन केले.

कळवा येथे भ्रमणभाषसंच चोरी करण्याच्या उद्देशाने तरुणास ठार मारणारे मुसलमान अटकेत !

एखाद्या गोष्टीसाठी कोणत्याही थराला जाणाऱ्या धर्मांधांची हिंसक मनोवृत्ती जाणा !

५ सहस्र रुपयांची लाच स्वीकारतांना सातारा नगरपालिकेच्या २ कर्मचाऱ्यांना रंगेहात पकडले !

भ्रष्टाचाराने बरबटलेली ही यंत्रणा सुधारण्यासाठी गुन्हेगाराला कठोर शिक्षा होणेच आवश्यक आहे ! लाचखोरांची सर्व संपत्ती जप्त करून त्यांची समाजात छी थू होईल अशी शिक्षा त्यांना केल्याविना इतरांवर जरब बसणार नाही !

सातारा बसस्थानकामध्ये एस्.टी. बसखाली सापडून महिला ठार !

येथील मध्यवर्ती बसस्थानकामध्ये शिवशाही बसच्या चाकाखाली सापडून गौडाबाई काळे (वय ७५ वर्षे) ही वृद्ध महिला ठार झाली. मुंबई येथे जाणारी शिवशाही एस्.टी. बस फलाटावर लावण्यात चालक व्यस्त होता. तेवढ्यात ही घटना घडली.

भिवंडी येथे हिंदुत्वनिष्ठांच्या वतीने महाराणा प्रताप जयंती साजरी !

भिवंडी येथे हिंदुत्वनिष्ठांनी एकत्र येऊन महाराणा प्रताप जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली. हिंदु जनजागृती समितीच्या कार्यात सहभागी असणारे धर्मप्रेमी श्री. दीपक गुप्ता आणि श्री. चंद्रशेखर यांनी प्रारंभी महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला.

ही मागणी मान्य करा !

वाराणसी (उत्तरप्रदेश) येथे ‘काशी धर्म परिषदे’च्या बैठकीत साधू आणि संत यांनी ‘ज्ञानवापीच्या प्रकरणात न्यायालयाचा आदेश येईपर्यंत जर तेथे पूजेला अनुमती मिळणार नसेल, तर नमाजपठणही बंद करावे’, अशी मागणी केली आहे.