लाचखोर वस्तू आणि सेवा कर निरीक्षक कह्यात !

पुणे – गोठवलेले बँक (अधिकोषातील) खाते पुन्हा चालू करून ‘क्लिअरन्स’ प्रमाणपत्र देण्यासाठी २ सहस्र रुपयांची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने वस्तू आणि सेवा कर कार्यालयातील निरीक्षकाला सापळा रचून पकडले. ज्योत्स्ना कोरडे (वय ३५ वर्षे) असे निरीक्षकाचे नाव असून या घटनेचे अधिक अन्वेषण पोलीस निरीक्षक ज्योती पाटील करत आहेत.

संपादकीय भूमिका

लाचखोरीत आता महिलाही पुढे असणे लज्जास्पद !