५ सहस्र रुपयांची लाच स्वीकारतांना सातारा नगरपालिकेच्या २ कर्मचाऱ्यांना रंगेहात पकडले !

प्रातिनिधिक छायाचित्र

सातारा, ४ जून (वार्ता.) – ५ सहस्र रुपयांची लाच स्वीकारतांना सातारा नगरपालिकेतील २ कर्मचाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे.  नवीन शासकीय नियमाप्रमाणे करआकारणी करण्यासाठी तक्रारदार यांनी नगरपालिकेशी संपर्क साधला. तेव्हा सातारा नगरपालिकेतील लिपिक प्रदीप निकम आणि शिपाई विनायक गोडबोले यांनी तक्रारदार यांना या कामासाठी ५ सहस्र रुपयांची लाच मागितली. याविषयी तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला. तपासणी केल्यावर तक्रारीमध्ये तथ्य अढळून आल्याने सापळा रचण्यात आला. तेव्हा लिपिक कदम आणि शिपाई गोडबोले यांना पकडण्यात आले. याविषयी पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याविषयी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक सुयज घाटगे यांनी माहिती दिली.

संपादकीय भूमिका

  • भ्रष्टाचाराने बरबटलेली ही यंत्रणा सुधारण्यासाठी गुन्हेगाराला कठोर शिक्षा होणेच आवश्यक आहे !
  • लाचखोरांची सर्व संपत्ती जप्त करून त्यांची समाजात छी थू होईल अशी शिक्षा त्यांना केल्याविना इतरांवर जरब बसणार नाही !