(भाग १८)
३. संतांच्या पुण्यतिथीच्या दिवशी त्यांचे निर्गुण तत्त्व कार्यरत असल्याने पायाभरणीसाठी त्या तिथीची निवड करणे
एका गुरुभक्तासाठी गुरुपरंपरेमध्ये असलेल्या संतांच्या पुण्यतिथीपेक्षा अधिक चांगला शुभ दिवस दुसरा कोणता असू शकतो ? संतांच्या पुण्यतिथीचे वैशिष्ट्य म्हणजे त्या दिवशी त्यांच्या कार्यासाठी त्यांचे निर्गुण तत्त्व कार्यरत असते. पौष मासात कोणताही शुभ दिवस नसल्यामुळे आम्ही प.पू. अनंतानंद साईश यांच्या पुण्यतिथीची निवड केली होती. खरे सांगायचे, तर ते ईश्वरेच्छेनुसारच झाले ! पीठाच्या स्थापनेच्या दिवसाच्या कार्यक्रमापूर्वी तीन दिवस आम्ही तेथील स्थानदेवता आणि ग्रामदेवता यांच्या मंदिरात जाऊन त्यांना विधीवत् निमंत्रण दिले अन् त्यांची यथोचित पूजा करून त्यांचा आशीर्वाद घेतला. जोपर्यंत मी तेथे उपासना पीठाच्या स्थापनेचा वर्धापनदिन साजरा करत होते, तोपर्यंत म्हणजे वर्ष २०१७ पर्यंत हे सर्व केले.
४. कार्यक्रमाच्या आधी प्रचंड थंडी असूनही कार्यक्रमाच्या दिवशी मात्र ऊन पडणे आणि यातूनच देवतेच्या प्रसन्नतेची अनुभूती घेता येणे
या कार्यक्रमामध्ये देश-विदेशातील उपासना पीठाचे साधक सहभागी होत असत. सर्वांनी हे अनुभवले की, पौष मासाच्या कडाक्याच्या थंडीत कार्यक्रमाच्या एक दिवस आधी आणि नंतर सुद्धा प्रचंड थंडी अन् धुके असायचे; परंतु कार्यक्रमाच्या दिवशी चांगले ऊन पडायचे. ही होती देवतेच्या प्रसन्न होण्याची अनुभूती ! असे प्रत्येक वर्षी होत असून ही अनुभूती सतत आठ वर्षे असेल, तर तुम्ही काय म्हणाल ? थोडक्यात समष्टी जीवन आणि कार्य निर्विघ्नपणे पार पडण्यासाठीसुद्धा देवता प्रसन्न होणे आवश्यक असते.
– पू. तनुजा ठाकूर, संस्थापिका, वैदिक उपासना पीठ (२६.३.२०२२)