
सातारा, ४ जून (वार्ता.) – येथील मध्यवर्ती बसस्थानकामध्ये शिवशाही बसच्या चाकाखाली सापडून गौडाबाई काळे (वय ७५ वर्षे) ही वृद्ध महिला ठार झाली. मुंबई येथे जाणारी शिवशाही एस्.टी. बस फलाटावर लावण्यात चालक व्यस्त होता. तेवढ्यात ही घटना घडली. सातारा शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे. कुणाच्या चुकीमुळे महिलेचा मृत्यू झाला ? याचे अन्वेषण पोलीस करत आहेत. घटनेची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात झाली आहे.
खांदेश्वर येथे रखडलेल्या कामांना गती देणार असल्याचे महापालिकेचे आश्वासन !
इगतपुरीतील धरणाजवळ पर्यटकांवर आक्रमण करणार्या ९ स्थानिक गुंडांना अटक !
वसईत मिठाईच्या दुकानदाराला लुटणार्या तोतया अधिकार्यांवर गुन्हा नोंद !
हॉटेलवर कारवाई करणार्या पोलिसाचे निलंबन रहित !
चाकण (पुणे) येथील साहाय्यक पोलीस निरीक्षकाने मागितली १० लाख रुपयांची लाच
मी छत्रपती शिवाजी महाराजांचा पाईक असून मैदान सोडून जाणारा नाही !