पुण्यात धावली परिवहन मंडळाची पहिली विद्युत् एस्.टी. ‘शिवाई’ !

महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या पदार्पणानिमित्त स्वारगेट एस्.टी. बस स्थानक येथे परिवहन मंडळ, पुणे विभागाच्या ‘शिवाई’ या बससेवेचा शुभारंभ, तसेच विद्युत् प्रभारक केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.

शहापूर (बेळगाव) येथील श्री गणेश आणि श्री मारुति मंदिरे खुली करण्यासाठी ‘रस्ता बंद’ आंदोलन !

खडेबाजार शहापूर येथील गौड ब्राह्मण समाजाची प्राचीन श्री गणेश आणि श्री मारुति मंदिर, अशी दोन मंदिरे उघडण्यासाठी नुकतेच रस्ता बंद आंदोलन करण्यात आले. या आंदोलनासाठी श्रीराम सेनेचे कार्यकर्ते आणि स्थानिक भाविक उपस्थित होते.

कत्तलीसाठी नेणाऱ्या ८ गायींचा ट्रकमध्ये गुदमरून मृत्यू !

गायींच्या होणाऱ्या हत्या रोखण्यासाठी गोप्रेमींनी प्रयत्न करणे अपेक्षित !

भारतद्वेषी तुर्कस्तान !

तुर्कस्तानची ही भारतद्वेषी वळवळ लक्षात घेता भारत सरकारने आता त्याच्या संदर्भात कठोर धोरणच अवलंबायला हवे. भारताला वेगवेगळ्या पद्धतीने विरोध करणाऱ्या तुर्कस्तानला समजेल अशा भाषेत भारताने प्रत्युत्तर दिले पाहिजे. तसे केल्यासच आंतरराष्ट्रीय स्तरावर भारत मुत्सद्दी म्हणून ओळखला जाईल !

साकीनाका (मुंबई) बलात्कार प्रकरणातील गुन्हेगाराला फाशी !

वर्ष २०२१ मध्ये साकीनाका परिसरात महिलेवर बलात्कार करून आरोपीने तिच्या देहाची क्रूरपणे विटंबना केली होती. उपचाराच्या वेळी महिलेचा मृत्यू झाला होता.

विकासकामांच्या प्रक्रियेतील दोषांमुळे पुणे महापालिकेच्या ९ अभियंत्यांना प्रत्येकी १० सहस्र रुपयांचा दंड !

प्रशासकीय अधिकारी आणि अभियंते यांना कामाची पद्धत माहिती नाही कि ते जाणूनबुजून करतात, याचीही चौकशी व्हायला हवी ?

संत ज्ञानेश्वर महाराज मृदंग वादन शिक्षण संस्थेच्या वतीने ‘मृदंग तपस्या’ कार्यक्रम !

शहरातील महादेव मंदिर, जुनी लक्ष्मी चाळ येथे २२ मे ते २९ मे या कालावधीत सोलापूर येथील संत ज्ञानेश्वर महाराज मृदंग वादन शिक्षण संस्थेच्या वतीने ‘मृदंग तपस्या’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

संभाजीनगर येथे १० सहस्र रुपयांची लाच घेतांना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यास अटक !

सेवानिवृत्तीनंतर शासकीय निवासस्थान सोडतांना ‘ना हरकत प्रमाणपत्र’ देण्यासाठी १० सहस्र रुपयांची लाच घेतांना सार्वजनिक बांधकाम विभागाचे स्थापत्य अभियांत्रिकी साहाय्यक मनोज नरवडे यांना १ जून या दिवशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावून अटक केली.

ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागांत ३८ अनधिकृत शाळा !

इतक्या संख्येत अनधिकृत शाळा उभारल्या जाईपर्यंत शिक्षण विभाग काय करत होता ? विद्यार्थ्यांची शैक्षणिक हानी करणाऱ्या संबंधितांना कठोर शिक्षा होणे अपेक्षित !