साकीनाका (मुंबई) बलात्कार प्रकरणातील गुन्हेगाराला फाशी !

मुंबई – साकीनाका येथील बलात्काराच्या प्रकरणातील गुन्हेगार मोहन चौहान याला २ जून या दिवशी दिंडोशी सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा दिली. वर्ष २०२१ मध्ये साकीनाका परिसरात महिलेवर बलात्कार करून आरोपीने तिच्या देहाची क्रूरपणे विटंबना केली होती. उपचाराच्या वेळी महिलेचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात न्यायालयाने ४ दिवसांपूर्वी आरोपीला दोषी ठरवले होते; मात्र २ जून या दिवशी शिक्षेवर सुनावणी झाली.