कत्तलीसाठी नेणाऱ्या ८ गायींचा ट्रकमध्ये गुदमरून मृत्यू !

  • संतप्त नागरिकांनी ट्रक पेटवला ! 

  • ट्रकचालक आणि वाहक पसार !

(प्रतिकात्मक छायाचित्र)

बुलढाणा – जिल्ह्यातील नांदुरा येथे कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या ८ गायींचा ट्रकमध्ये गुदमरून मृत्यू झाला. यानंतर संतप्त जमावाने ट्रक पेटवून दिला. त्यामुळे येथील नांदुरा परिसरात तणाव निर्माण झाला होता. नांदुरा-मलकापूर राष्ट्रीय महामार्गावरील दिवाणी न्यायालयासमोर हा प्रकार घडला. चालक आणि वाहक यांनी घटनास्थळावरून पळ काढला. या ट्रकमध्ये २५ गोवंशियांना कोंबून भरले होते.

अग्नीशमनदलाने आग विझवली. या संपूर्ण प्रकारामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काही घंटे खोळंबली होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता दंगा नियंत्रण पथक आणि अतिरिक्त पोलीसदल नांदुरा येथे तैनात करण्यात आले आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारीही तेथे थांबले आहेत. प्राण्यांचा छळ केल्याप्रकरणी ट्रकचालक आणि वाहक यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

संपादकीय भूमिका 

  • गोवंशहत्या बंदी कायद्याची प्रभावी कार्यवाही कधी होणार ? आणखी किती गायींचा मृत्यू झाल्यावर कायद्याच्या कार्यवाहीकडे सरकार लक्ष देणार ?
  • गायींच्या होणाऱ्या हत्या रोखण्यासाठी गोप्रेमींनी प्रयत्न करणे अपेक्षित !