मुंबई – कोरोनाच्या कालावधीत मद्य घरपोच देण्याचा घेतलेला निर्णय राज्य सरकारने रहित केला आहे. याविषयी गृहविभागाने उत्पादन शुल्क विभागाला पत्र पाठवून याविषयीची सूचना केली आहे. गृह विभागाकडून राज्य उत्पादन शुल्क आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, कोरोनाच्या काळात सामाजिक अंतर राखले जावे, परवानाधारक दुकानांतून मद्य घरपोच देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. कोरोना संसर्गाचे प्रमाण न्यून झाल्याने हा निर्णय रहित करण्यात येत आहे.