ज्ञानवापीच्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात २० मे ला सुनावणी  

ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाविषयी १८ मे या दिवशी सुनावणी होणार होती. त्या वेळी हिंदु पक्षाने सर्वोच्च न्यायालयाकडे वेळ मागितल्यावर न्यायालयाने यावर उद्या, १९ मे या दिवशी दुपारी ३ वाजता सुनावणी निश्‍चित केली आहे.

ज्ञानवापी परिसरात सापडलेले अवशेष मंदिरांचेच असण्याची शक्यता ! – अजय कुमार मिश्रा

ज्ञानवापी परिसरात सापडले देवतांच्या खंडित मूर्तींचे अवशेष
ज्ञानवापी परिसरात जे अवशेष पाहिले त्यावरून ते मंदिर असण्याचीच शक्यता ! – अजय कुमार मिश्रा

ज्ञानवापीच्या घुमटाखाली मंदिराचे मूळ घुमट ! – हिंदु पक्षाचे अधिवक्ता (पू.) हरि शंकर जैन

पू. (अधिवक्ता) हरि शंकर जैन म्हणाले की, आज सर्वेक्षणाचा जो अहवाल सादर करण्यात आला आहे, त्यात स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की, ज्ञानवापीमध्ये अनेक गोष्टींवर प्लास्टर ऑफ पॅरिस लावून लपवण्यात आले आहे.

खाण लिज क्षेत्र रिक्त करण्याच्या गोवा शासनाच्या आदेशाला खाण आस्थापनांचे न्यायालयात आव्हान

सरकार राज्यातील खाण व्यवसाय पुन्हा चालू करण्यासाठी प्रयत्नशील आहे. पहिल्या टप्प्यात ८८ खाण लिजांचा लिलाव केला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासनाने सर्व खनिज लिज रिक्त करण्याचे आदेश दिले आहेत.

अनधिकृत पब आणि ‘डान्स बार’ यांच्यावर कारवाई करा ! – कळंगुटवासियांची मागणी

अशी मागणी जनतेला का करावी लागते ? अनधिकृत पब आणि ‘डान्स बार’ कुणाच्या संगनमताने चालतात ? संबंधितांवर कारवाई का होत नाही ?

वेंगुर्ला येथील पत्रकार सुरेश कौलगेकर यांना राज्यस्तरीय दर्पण पुरस्कार घोषित

कौलगेकर यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून क्रीडा, कला, शिक्षण, साहित्य, पर्यटन, कृषी या क्षेत्रांत पत्रकारिता करतांना अनेक दुर्लक्षित घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या सर्वांगीण कार्याची नोंद घेऊन त्यांना हा पुरस्कार घोषित करण्यात आला.

विज्ञानाची निरर्थकता !

मानवाला माणुसकी न शिकवणाऱ्या, उलट विध्वंसक अस्त्रे, शस्त्रे देणाऱ्या विज्ञानाचे मूल्य शून्य आहे !

भ्रष्टाचाराच्या विरोधात लढणे आणि योग्य कृतींसाठी न्याय मिळवणे, हे अधिवक्त्यांचे कर्तव्य ! – अधिवक्ता नीलेश सांगोलकर, हिंदु विधीज्ञ परिषद

आजकाल प्रत्येकच क्षेत्रात भ्रष्टाचार होत आहे, याविरुद्ध लढण्यासाठी आणि योग्य कृतींसाठी न्याय मिळवणे, हे अधिवक्त्यांचे कर्तव्य आहे. अशा अनेक घटनांना सामोरे जाण्यासाठी अधिवक्त्यांनी साधना करणे, स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया राबविणे अत्यावश्यक आहे.

देहलीच्या उपराज्यपालांचे त्यागपत्र

देहलीचे उपराज्यपाल अनिल बैजल यांनी १८ मे या दिवशी त्यांच्या पदाचे अचानक त्यागपत्र दिले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे त्यांनी त्यागपत्र पाठवले

परदेशी पर्यटनाकरता जाणाऱ्यांना परदेशी चलनांचा तुटवडा !

पर्यटनासाठी परदेशामध्ये जाण्यासाठी पर्यटकांना परकीय चलनाचा तुटवडा भासू लागला आहे. अचानक मागणी वाढल्यामुळे हा तुटवडा भासत असल्याचे पर्यटन क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे.