परदेशी पर्यटनाकरता जाणाऱ्यांना परदेशी चलनांचा तुटवडा !

प्रतिकात्मक छायाचित्र

पुणे – पर्यटनासाठी परदेशामध्ये जाण्यासाठी पर्यटकांना परकीय चलनाचा तुटवडा भासू लागला आहे. पर्यटनाला जातांना सोबत ३०० डॉलर्सपर्यंत रोख रक्कम जवळ ठेवता येते. उर्वरित रक्कम प्री-पेड कार्डद्वारे पर्यटकांना जवळ ठेवता येते. रोख परकीय चलन हवे असल्यास त्यावर २ ते ४ टक्के रक्कम अधिक द्यावी लागते. तरीही त्यासाठी २ ते ३ दिवस थांबावे लागत आहे. अचानक मागणी वाढल्यामुळे हा तुटवडा भासत असल्याचे पर्यटन क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे. कोरोनामुळे परदेशगमन थांबले होते. आता सर्वच देशांनी विमानसेवा चालू केली आहे. त्यामुळे अमेरिका, दुबई, सिंगापूर, मलेशिया, थायलंड, तसेच युरोपमध्ये जाणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढली आहे. दिऱ्हाम, डॉलर, युरो, पौंड, बाथ या परदेशी चलनांना मागणी येत आहे.