श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या खोलीची स्वच्छता करतांना साधिकेला गुरु-शिष्य आणि महाविष्णु-महालक्ष्मी यांच्या एकरूपतेविषयी आलेली अनुभूती
‘मी आणि सहसाधिका, दोघी मिळून श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ रामनाथी आश्रमात वास्तव्याला असतांना ज्या खोलीत रहातात, त्या खोलीची स्वच्छता करत होतो. तेव्हा मला त्या खोलीतील प्रसाधनगृहातील थंड पाण्याचा नळ चालू केल्यावर त्या नळातून एक नाद ऐकू आला.