केंद्र सरकार राहुल भट यांच्या हत्येसारख्या घटना सहजतेने का घेत आहे ? – डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी

नवी देहली – काश्मिरी हिंदु असलेले राहुल भट यांची जिहादी आतंकवाद्यांनी हत्या केल्यानंतर त्यास मोठा विरोध होत असतांना भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनीही ट्वीट करत केंद्र सरकारला प्रश्‍न विचारले आहेत.

ते म्हणाले, सरकारने राहुल भट यांच्या हत्येसारख्या घटनांना सहजतेने घेऊ नये. केंद्र सरकार सध्या तसेच करत आहे. जर सरकार घाबरट असेल आणि अशा घटनांना काहीही प्रत्युत्तर देत नसेल, तर हिंदुत्वाविषयी बोलण्याचा लाभ काय ? पंतप्रधान केवळ जम्मूतच का जातात ? त्यांनी त्वरित श्रीनगरमध्येही जायला हवे.