आजपासून ज्ञानवापी मशिदीचे सर्वेक्षण होणार

वाराणसी (उत्तरप्रदेश) – वाराणसीच्या दिवाणी न्यायालयाने ज्ञानवापी मशिदीचे सर्वेक्षण आणि चित्रीकरण १७ मे पर्यंत पूर्ण करण्याचा आदेश दिल्यानंतर १३ मे या दिवशी सकाळी ८ ते दुपारी १२ या वेळेत त्याला प्रारंभ होणार होता; मात्र तो होऊ शकला नाही. याऐवजी १४ मे पासून याला प्रारंभ होेणार आहे, अशी माहिती वाराणसीचे जिल्हाधिकारी कौशल राज शर्मा यांनी मुसलमान पक्षकारांशी झालेल्या बैठकीनंतर दिली.

जिल्हाधिकारी शर्मा म्हणाले की, उद्या होणार्‍या सर्वेक्षणापूर्वी सर्व पक्षांची बैठक बोलावण्यात आली होती. सर्वांना शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (न्यायालयाने निर्णय दिल्यानंतरही येथे कोण शांतता बिघडवण्याचा प्रयत्न करू शकते, हे जिल्हाधिकार्‍यांनी सांगायला हवे होते ! जर असे कुणी करणार असेल, तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश न्यायालयाने दिलेले आहेत ! – संपादक)