राज ठाकरे यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद !

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी १ मे या दिवशी मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर झालेल्या सभेतील १२ अटींचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी त्यांच्यासह आयोजकांविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

मुसलमान इस्लामद्वेषाचे बळी ठरत असल्याचे अमेरिकी राष्ट्राध्यक्षांचे फुकाचे बोल !

जगभर ईद साजरी होत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी, ‘जगभरात मुसलमान इस्लामद्वेषाचे बळी ठरत आहेत. अमेरिका अधिकाधिक सशक्त करण्यासाठी प्रयत्न करत आहेत; मात्र त्यांना अनेक धोके आहेत’, असे वक्तव्य केले.

जोधपूरमध्ये भगवा काढून हिरवा ध्वज लावण्यावरून हिंसाचार !

असे व्हायला जोधपूर भारतात आहे कि पाकिस्तानमध्ये ?
राजस्थानमध्ये हिंदूंवर सातत्याने होणारी आक्रमणे रोखण्यासाठी केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा !

काश्मीरमध्ये ईदच्या नमाजपठणानंतर मशिदीतून बाहेर आलेल्या जमावाकडून सुरक्षादलांवर दगडफेक

हिंदूंच्या मंदिरांतील आरतीनंतर कधी सुरक्षादलांवर दगडफेक करण्यात आल्याची घटना या देशाच्या इतिहास कधी घडलेली नाही आणि कधी घडणारही नाही, हे लक्षात घ्या !

उत्तरप्रदेशच्या संभल जिल्ह्यात ईदच्या वेळी मुसलमानांच्या २ गटांमध्ये गोळीबार

उत्तरप्रदेशच्या संभल जिल्ह्यातील सदीरनपूर गावामध्ये ईदचा सण साजरा करतांना मुसलमानांच्या २ गटांमध्ये उसने घेतलेले पैसे परत करण्याच्या सूत्रावरून वाद झाला. या वादाचे रूपांतर गोळीबार आणि दगडफेक यांमध्ये झाले.

भाजप देशात ‘छोटी पाकिस्ताने’ बनवण्याचा प्रयत्न करत असल्याचा मेहबूबा मुफ्ती यांचा कांगावा !

भारतात कोण छोटी पाकिस्ताने निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे, हे सर्वज्ञात आहे. त्यामुळ महबूबा मुफ्ती यांचे हे वक्तव्य म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा होय !

आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्य तेलाची मागणी घटल्याने भारतात तेल स्वस्त !

भारत हा खाद्य तेलाचा मोठा आयातदार देश आहे. गेल्या आठवड्यात मोहरीच्या तेलाच्या आयातीमध्ये घट झाली असतांनाही मागणी न्यून झाल्याने तेलाचे दर स्वस्त झाले आहेत.

(म्हणे) ‘गोल टोपी घालून ‘ईद मुबारक’ म्हणतांनाचा व्हिडिओ बनवून पाठवा !’

प्रयागराज (उत्तरप्रदेश) येथील शाळेचा विद्यार्थ्यांना फतवा
संतप्त हिंदु पालकांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार !

गाळ काढलेल्या शिव नदीत नागरिकांकडून टाकला जात आहे पुन:पुन्हा कचरा

अशा बेशिस्त आणि दायित्वशून्य नागरिकांना प्रशासनाने दंड ठोठवायला हवा !

चाफेकरबंधूंचे चरित्र आत्मसात केल्यास देश वाचेल !- ह.भ.प. चारुदत्त आफळे

चाफेकरबंधूनी इंग्रजांच्या जुलमी राजवटीविरुद्ध बंड पुकारून इंग्रजांवर जरब बसवली. त्यांच्या त्यागामुळे भारतियांचे प्राण वाचले, असे प्रतिपादन ह.भ.प. चारुदत्त आफळे यांनी संगमेश्वर तालुक्यातील धामणी येथे ‘कलांगण’ने आयोजित केलेल्या कीर्तनात केले.