नवी देहली – आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्य तेलाच्या दरात घसरण झाल्याने त्याचा परिणाम देशातील खाद्य तेलाच्या किमतींवरही झाला असून देशात खाद्य तेलाच्या भावात काहीशी घट झाली आहे. मोहरी, सोयाबीन, तीळ आणि पाम तेल यांचे दर स्वस्त झाले आहेत. भारत हा खाद्य तेलाचा मोठा आयातदार देश आहे. गेल्या आठवड्यात मोहरीच्या तेलाच्या आयातीमध्ये घट झाली असतांनाही मागणी न्यून झाल्याने तेलाचे दर स्वस्त झाले आहेत.
खाने के कई तेलों की कीमतों में आई गिरावट, जानिए कितने रुपये में मिल रहा है सरसों का तेल https://t.co/2kPR9lAd8p via @NavbharatTimes #EdibleOil #mustardoil pic.twitter.com/k188Q8qcZf
— ET Hindi (@ETHindi) May 2, 2022
१. इंडोनेशियाकडून प्रतीवर्षी भारतात मोठ्या प्रमाणात पाम तेलाची आयात करण्यात येते; मात्र यंदा इंडोनेशियामध्ये महागाईचा भडका उडाला असून तेथे तेलाचा तुटवडा भासत आहे. त्यामुळे इंडोनेशियाने पाम तेलाच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. याचा मोठा फटका भारताला बसला आहे.
२. सूर्यफूलाच्या तेलासाठी भारत युक्रेनवर अवलंबून आहे. सध्या रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये युद्ध चालू असल्यामुळे युक्रेनमधून होणारी तेलाची निर्यात ठप्प झाली आहे. त्यामुळे या तेलाच्या आयातीसाठी अन्य पर्याय शोधण्याचे आव्हान भारतासमोर आहे. ते पेलले नाही, तर भविष्यात तेलाचा तुटवडा जाणू शकतो.