उत्तरप्रदेशच्या संभल जिल्ह्यात ईदच्या वेळी मुसलमानांच्या २ गटांमध्ये गोळीबार

संभल – उत्तरप्रदेशच्या संभल जिल्ह्यातील सदीरनपूर गावामध्ये ईदचा सण साजरा करतांना मुसलमानांच्या २ गटांमध्ये उसने घेतलेले पैसे परत करण्याच्या सूत्रावरून वाद झाला. या वादाचे रूपांतर गोळीबार आणि दगडफेक यांमध्ये झाले. या वेळी उडालेल्या चकमकीत ४ जण घायाळ झाले. घायाळ झालेल्यामध्ये फिरोज, गुलाम मुर्तजा, साहील आणि मुजीब यांचा समावेश आहे. घायाळ झालेल्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. या प्रकरणी पुढील अन्वेषण चालू आहे, अशी माहिती असमोली पोलीस ठाण्याचे निरीक्षक विद्युत गोयल यांनी दिली. (धार्मिक उत्सवाच्या वेळीही दंगल करणारे धर्मांध – संपादक)