भाजप देशात ‘छोटी पाकिस्ताने’ बनवण्याचा प्रयत्न करत असल्याचा मेहबूबा मुफ्ती यांचा कांगावा !

श्रीनगर – जम्मू-कश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीपल्स डेमोक्रेटिक पार्टीच्या (पीडीपीच्या) नेत्या मेहबूबा मुफ्ती यांनी, ‘भाजप देशातील धर्मनिरपक्षतेवर ‘बुलडोझर’ चालवून देशात अनेक ‘छोटी पाकिस्ताने’ बनवत आहे’, असा कांगावा केला. या वेळी त्यांनी मध्यप्रदेशमधील खरगोन आणि देहलीतील जहांगीरपुरी येथील अवैध बांधकाम आणि अतिक्रमण यांवर करण्यात आलेल्या कारवाईचाही उल्लेख केला. ‘अल्पसंख्यांकांना पाकिस्तानला जाण्याचा सल्ला दिला जात आहे. सरकारने देशात काहीही नवीन केले नाही, उलट समाजामध्ये भेद निर्माण केला आणि धर्मनिरपेक्ष संस्कृतीला गालबोट लावले’, असा थयथयाटही त्यांनी केला.

१. मुफ्ती पुढे म्हणाल्या की, केंद्र सरकार प्रत्येक सूत्रावर अपयशी ठरले असून रोजगार, बुडती अर्थव्यवस्था आदी समस्यांवरून लोकांचे लक्ष भरकटवण्यासाठी ते हिंदू-मुसलमान सूत्राचा उपयोग करत आहे.

२. मेहबूबा मुफ्ती यांनी या वेळी मुसलमान समाजाचे कौतुकही केले. ‘सरकार आणि सरकारमधील गटांकडून सातत्याने दबाव असतांनाही समाजाने धैर्य सोडलेले नाही’, असे महबूबा म्हणाल्या. (भारतात धर्मांधांचा उद्दामपणा एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढला आहे की, ते आता प्रशासन आणि पोलीस यांनाही जुमानत नाहीत. त्यामुळे अशी वक्तव्ये मुफ्ती कोणत्या आधारावर करत आहेत ? – संपादक)

संपादकीय भूमिका

  • भारतात कोण छोटी पाकिस्ताने निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे, हे सर्वज्ञात आहे. त्यामुळ महबूबा मुफ्ती यांचे हे वक्तव्य म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा होय !