मुसलमान इस्लामद्वेषाचे बळी ठरत असल्याचे अमेरिकी राष्ट्राध्यक्षांचे फुकाचे बोल !

न्यूयॉर्क – जगभर ईद साजरी होत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी, ‘जगभरात मुसलमान इस्लामद्वेषाचे बळी ठरत आहेत. अमेरिका अधिकाधिक सशक्त करण्यासाठी प्रयत्न करत आहेत; मात्र त्यांना अनेक धोके आहेत’, असे वक्तव्य केले. ईदच्या निमित्ताने व्हाईट हाऊस येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. मुसलमानांना हिंसा आणि संघर्ष यांचा सामना करावा लागत आहे. अमेरिका  हे असे एकमेव राष्ट्र आहे, जे धर्म, वंश किंवा जात या आधारांवर नव्हे, तर एका विचाराच्या आधारावर संघटित आहे. बायडेन यांनी जगभर ईद साजरी करणार्‍या मुसलमानांना शुभेच्छाही दिल्या.