काश्मीरमध्ये ईदच्या नमाजपठणानंतर मशिदीतून बाहेर आलेल्या जमावाकडून सुरक्षादलांवर दगडफेक

अनंतनाग (जम्मू काश्मीर) – येथे ईदच्या नमाजानंतर मशिदीतून बाहेर पडलेल्यांकडून सुरक्षादलांवर जोरदार दगडफेक करण्यात आली. (मशिदीतून नमाजपठणानंतर अशा प्रकारे दगडफेक करण्याच्या घटनांना गेल्या काही वर्षांत ऊत आला आहे. या घटना रोखण्यासाठी देशातील एकही निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी कधी प्रयत्न करत नाहीत किंवा अशांना उपदेशाचे चार डोसही पाजण्याची तसदी घेत नाही, हे लक्षात घ्या ! – संपादक) दगडफेक करणार्‍यांमध्ये तरुणांचा अधिक समावेश होता. या लोकांकडून ‘स्वतंत्र काश्मीर’च्या घोषणा देण्यात येत होत्या. या वेळी जमावाला शांत करण्यास पोचलेल्या सैनिकांवर आणि त्यांच्या वाहनावरही दगडफेक करण्यात आली. ‘सध्या येथे परिस्थिती नियंत्रणात आहे’, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

संपादकीय भूमिका

  • हिंदूंच्या मंदिरांतील आरतीनंतर कधी सुरक्षादलांवर दगडफेक करण्यात आल्याची घटना या देशाच्या इतिहास कधी घडलेली नाही आणि कधी घडणारही नाही, हे लक्षात घ्या !