‘महाराष्ट्र राज्य गवंडी समाज सेवा संघा’च्या अध्यक्षपदी अविनाश आळंदीकर यांची नियुक्ती !

३ एप्रिल या दिवशी पंढरपूर येथे झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी अहमदनगर येथील ज्येष्ठ समाजबांधव मनोज राजापूरे होते.

जितेंद्र आव्हाड यांना मृत पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांविषयी नव्हे, तर मशीद आणि भोंगा यांविषयी पुळका ! – मनसे

जाधव यांनी म्हटले, ‘‘ठाण्यात वर्ष २००७-२००८ ला राबोडी आणि दुसरी भिवंडी या शहरांमध्ये दोन मोठ्या दंगली झाल्या होत्या. यात आपल्या दोन पोलिसांना प्राण गमावावे लागले होते. त्यांची क्रूर हत्या करण्यात आली. त्यांच्या कुटुंबियांना काय वाटत असेल ?

तळोजा (नवी मुंबई) येथे गोवंशियांची हत्या करणाऱ्या धर्मांधाला अटक !

गोवंश हत्या बंदीचा कायदा असूनही सर्रास होणाऱ्या गोवंशियांच्या हत्या थांबण्यासाठी कठोरात कठोर शिक्षा तत्परतेने होणे याला पर्याय नाही !

खासदार संजय राऊत यांची मालमत्ता अंमलबजावणी संचालनालयाकडून जप्त !

यामध्ये अंमलबजावणी संचालनालयाने राऊत यांची दादर येथील १ सदनिका, तसेच रामनाथ (अलिबाग) येथील ८ भूखंड कह्यात घेतले.

पिंपरी (जिल्हा पुणे) येथे कुरिअरने मागवल्या ९७ तलवारी, २ कुकरी, ९ म्यान !

संभाजीनगर पाठोपाठ पिंपरी येथे कुरिअरने एवढ्या मोठ्या प्रमाणात घातक शस्त्रे येणे गंभीर आहे ! यामागील सूत्रधार कोण आहे ? याचा शोध पोलिसांनी घेणे अपेक्षित आहे. अशा घटनांमुळे गुन्हेगारांवर पोलिसांचा धाक राहिलेला नाही, हे लक्षात येते.

भोंग्यांचा धर्म आणि ‘राज’ कारण !

३ राज्यांत ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा होणे, कर्नाटकात धर्मांतरविरोधी कायदा, तसेच मंदिरे सरकारीकरणातून मुक्त होणे, काश्मिरींवरील अन्यायाला अमेरिकेतील मानवाधिकार संघटनेने वंशविच्छेद घोषित करणे, हलालविरोधात जागृती होणे आणि परत अवैध भोंग्यांचा विषय वर येणे, हे कालसुसंगत घडत आहे. हिंदूंनी मात्र आता धर्माच्या बाजूने रहायचे कि अधर्माच्या याचा निर्णय वेळोवेळी घ्यायचा आहे !

‘श्री रामदेव तासगाव’ यांचा ‘श्री रामोत्सव २०२२’ गुढीपाडव्यापासून प्रारंभ !

गुढीपाडवा म्हणजेच २ एप्रिलपासून ‘श्री रामदेव तासगाव’ यांचा ‘श्री रामोत्सव २०२२’ प्रारंभ झाला असून १३ एप्रिलअखेर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

हे सत्य मौलाना, मौलवी का सांगत नाहीत ?

हलाल मांस इस्लामेतर लोकांसाठी नाही; म्हणजे जे इस्लामचे अनुयायी नाहीत, त्यांच्यासाठी हे नाही, अशी स्पष्टोक्ती प्रसिद्ध गायक लकी अली यांनी फेसबूकवर पोस्ट करून केली आहे.

स्वातंत्र्यपूर्वकाळात इंग्रजांनी चालू केलेली न्यायालयांना सुट्ट्या देण्याची प्रथा अजूनही चालू असणे आणि परिणामस्वरूप जनतेच्या न्यायदानाला विलंब होणे !

‘सध्या न्यायालयामध्ये अगणित खटले प्रलंबित आहेत. त्यामुळे असंख्य लोक, संस्था आणि पीडित जनता न्यायाच्या प्रतीक्षेत जीवन कंठत आहेत. यासंदर्भात कुणीच विचार का करत नाही ? कि याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते, हेच समजत नाही.’

राज्यकारभार सुव्यवस्थितपणे चालण्यासाठी राजाने पार पाडावयाची कर्तव्ये आणि घ्यावयाची काळजी !

राज्यकारभार सुव्यवस्थितपणे चालण्यासाठी राजाने कोणती कर्तव्ये पार पाडावीत आणि काय काळजी घ्यावी हे या लेखात दिले आहे.