पुणे – बोपदेव घाटात महाविद्यालयीन तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपीने स्वतःचे, तसेच साथीदाराचे नाव खोटे सांगून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याचे अन्वेषणात उघड झाले आहे. या गुन्ह्याचे अन्वेषण संवेदनशील आहे. त्यामुळे आरोपींना पोलीस कोठडी मिळवून त्यांची सखोल चौकशी करणे आवश्यक आहे, असा युक्तीवाद सरकारी अधिवक्त्या डॉ. आम्रपाली कस्तुरे यांनी केला. सरकारी पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपींना ८ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. आरोपींनी अशा पद्धतीचे अनेक गुन्हे पुणे जिल्ह्यात केल्याची शक्यता असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. बोपदेव घाट प्रकरणातील मुख्य आरोपीला घेऊन पोलीस त्याच्या मूळ गावी लातूर आणि नागपूर येथे जाणार आहेत. साक्षीदारांच्या समक्ष त्यांची चौकशी होईल.
संपादकीय भूमिकायातून आरोपींची वृत्ती लक्षात येते. त्यांचे पुन्हा अशी कृती करण्याचे धाडस होणार नाही, अशी कठोर शिक्षा त्यांना होणे आवश्यक आहे ! |