सांगली – सांगली जिल्ह्यातील गडदुर्गांचा ऐतिहासिक संदर्भासह मागोवा घेणार्या श्री. महेश कदम लिखित ‘सांगली जिल्ह्यातील गड-कोट-वाडे’ या पुस्तकाचे प्रकाशन लोकमान्य टिळक स्मारक येथे नुकतेच करण्यात आले. या प्रसंगी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी, मराठा साम्राज्याचे सेनापती श्रीमंत परशुरामभाऊ पटवर्धन यांचे वंशज श्री. राजेंद्र पटवर्धन, सेनानी विठोजी चव्हाण हिम्मतबहाद्दर यांचे वंशज अधिवक्ता संग्रामसिंह चव्हाण हिम्मतबहाद्दर, ‘श्रीशिवतीर्थ प्रकाशन’चे श्री. मिलिंद तानवडे, श्री. नितीनकाका शिंदे यांसह अन्य उपस्थित होते.
सर्वच मान्यवरांनी श्री. महेश कदम यांच्या पुस्तकाचे कौतुक करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन श्री. विजय कडणे यांनी केले. कार्यक्रमाचा प्रारंभ प्रेरणामंत्राने, तर सांगता ध्येयमंत्राने झाली. या पुस्तकासाठी श्री. महेश कदम यांना ९२८४६२४२९१ यावर संपर्क साधावा.