मुंबई – येथील वडाळा परिसतरात एका वीजतंत्रज्ञाकडे (इलेक्ट्रिशियनकडे) १ कोटी ११ लाख रुपये किमतीचे सोन्याचे पावडर असलेले चेंडू सापडले आहेत. त्याचे नाव अब्दुलकर अब्दुल मजीद असे असून तो चेन्नई येथील आहे. त्याने डोंगरी येथे रहाणार्या शकीलकडून हे सोन्याचे चेंडू घेतले होते. ते त्याला अंधेरीत एकाला द्यायचे होते; मात्र त्यापूर्वीच पोलिसांनी मजीदला अटक केली. त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्याला पकडले. त्यांच्याकडील सोन्याच्या चेंडूंचे वजन १,४५७.२४ ग्रॅम होते; मात्र त्याचे देयक त्याच्याकडे नव्हते. जप्त करण्यात आलेले सर्व चेंडू प्लास्टिकच्या टेपने गुंडाळलेले होते.
संपादकीय भूमिकागुन्हेगारीत पुढे असणार्या धर्मांधांवर कठोर कारवाई कधी होणार ? सोन्याच्या चेंडू प्रकरणातील टोळीचाही पोलिसांनी तातडीने शोध घ्यायला हवा ! |