हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी मागवलेले समोसे पोलिसांनीच खाल्ले ! 

सीआयडीने केली चौकशी

हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुख्खू

शिमला (हिमाचल प्रदेश) – हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुख्खू यांच्यासाठी मागवण्यात आलेले समोसे त्यांच्यापर्यंत न पोचल्याने याची राज्य अन्वेषण पथकाकडून (सीआयडीकडून) चौकशी करण्यात आली. हे समोसे आणि केक यांवरून वाद निर्माण झाला आहे. सीआयडीच्या अधिकार्‍याने सांगितले की, समन्वयाच्या अभावामुळे असे झाले आहे. हे समोसे पोलिसांनी खाल्ल्याचे उघड झाले.

२१ ऑक्टोबर या दिवशी सीआयडीच्या मुख्यालयात झालेल्या समारंभाला सुखविंदर सिंग सुख्खू प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या वेळी सुख्खू यांनी हॉटेलमधून समोसे मागवले होते; मात्र ते त्यांना मिळाले नाहीत. हे समोसे पोलिसांमध्ये वितरित केले गेले. पोलिसांना सांगण्यात आले होते की, मुख्यमंत्र्यांच्या जेवणाच्या मेनूमध्ये समोसे नव्हते. या प्रकरणी ५ पोलीस अधिकार्‍यांवर आरोप करण्यात आले असून त्यांना १० दिवसांत उत्तर देण्यास सांगण्यात आले आहे.

संपादकीय भूमिका

काँग्रेस सरकार कसा कारभार करत आहे ?, हेच यातून स्पष्ट होते !