पुणे – पाणीपट्टी देयक सरासरी काढले जात असतांना ते नियमितपणे जितका वापर होईल, तेवढे देयक काढण्यासाठी १ सहस्र ६०० रुपयांची लाच घेतली आहे. या प्रकरणी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील ‘ह’ प्रभागातील पाणी विभागातील पाणीमीटर निरीक्षक विकास गव्हाणे आणि कंत्राटी संगणकचालक आशा चौपाली यांना अटक केली असून त्यांच्यावर गुन्हा नोंद केला आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली. (साध्या कामांपासून ते मोठी कामे करण्यासाठी लाच घेणार्यांवर कठोर कारवाई करून त्यांच्यावर जरब बसवणे आवश्यक ! – संपादक)