तळोजा (नवी मुंबई) येथे गोवंशियांची हत्या करणाऱ्या धर्मांधाला अटक !

गोवंश हत्या बंदीचा कायदा असूनही सर्रास होणाऱ्या गोवंशियांच्या हत्या थांबण्यासाठी कठोरात कठोर शिक्षा तत्परतेने होणे याला पर्याय नाही ! – संपादक

नवी मुंबई – तळोजा येथे गोवंशीय जनावरांची हत्या करणाऱ्या इमरान अब्दुल अजिज पटेल याला अटक करण्यात आली असून आणखी एका फरार आरोपीचा पोलीस शोध घेत आहे.

तळोजा येथील कब्रस्तानच्या पाठीमागील बाजूस गोवंशीय जनावरांची हत्या केली जात आहे, अशी माहिती तळोजा पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर १ एप्रिल या दिवशी पोलिसांनी या ठिकाणी धाड टाकली. यामध्ये प्रतिबंधित असलेल्या गोवंशीय जनावरांची हत्या करतांना आरोपी आढळून आले. या वेळी ९० सहस्र रुपयांचा मुद्देमाल, गायी आणि अन्य जनावरे कह्यात घेतली. अटक केलेल्या आरोपीने मांसविक्री करण्याच्या हेतूने असे कृत्य केल्याचे अन्वेषणात समोर आले आहे.