जगात एकमेव धर्म आहे हिंदु धर्म !

सनातन हिंदु धर्माला उत्पत्ती नसल्यामुळे, म्हणजे तो अनादि असल्यामुळे तो अनंत काळपर्यंत रहाणार आहे. हे हिंदु धर्माचे वैशिष्ट्य आहे. जगात दुसरा धर्मच नसल्यामुळे ‘सर्वधर्मसमभाव’ हा शब्द किती अयोग्य आहे, हेही यावरून लक्षात येते.’

रशियावर तात्काळ कार्यवाही करा किंवा संघटनेला विसर्जित करा !

संयुक्त राष्ट्रांनी जगातील एकतरी समस्या सोडवली आहे का ? भारताने काश्मीरचा प्रश्न संयुक्त राष्ट्रांत नेऊन ७४ वर्षे झाली आहेत; मात्र त्यावर कोणताही निर्णय होऊ शकलेला नाही. त्यामुळे ‘झेलेंस्की यांना जे वाटते, तेच आता करण्याची आवश्यकता आहे’, अशी आता जगभरातून मागणी झाली पाहिजे.

सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांच्यावर ईडीकडून गुन्हा नोंद !

मेधा पाटकर यांनी अनेक विकास प्रकल्पांना विरोध केला आहे. त्यामुळे त्यांना कोण देणग्या देते, त्यांचे कामकाज कसे चालते, याविषयीची माहिती जनतेसमोर येणे आवश्यक आहे. त्यांच्या स्वयंसेवी संस्थेची सखोल चौकशी होऊन सत्य समोर येणे आवश्यक आहे.

मंदिरांच्या माध्यमातूनच हिंदूंचे संघटन होते आणि त्यांना धर्मकार्य करण्याची शक्ती मिळते ! – किरण दुसे, हिंदु जनजागृती समिती

देवस्थान भूमी परत मिळवण्यासाठीच्या लढ्याची माहिती देण्याच्या हेतूने आयोजित कार्यक्रम !

मद्यांच्या दुकानांना महापुरुष आणि गड-दुर्ग यांची नावे देऊ नयेत ! – मुंबई महानगरपालिका

राज्यशासनानेही अशा प्रकारचा निर्णय घ्यावा !

पुणे शहर परिसरातील मशिदींवरील अनधिकृत भोंगे हटवण्यासाठी मनसेकडून पुणे पोलिसांना ४ दिवसांचे ‘अल्टीमेटम’

डेक्कन, विश्रामबाग आणि फरासखाना परिसरातील मशिदींवरील अनधिकृत भोंगे हटवावे, यासाठी मनसेचे राज्य सरचिटणीस हेमंत संभूस यांनी पुणे पोलिसांना पत्र दिले आहे. हे भोंगे हटवण्यासाठी मनसेकडून पुणे पोलिसांना ४ दिवसांचे ‘अल्टीमेटम’ (समयमर्यादा) देण्यात आले आहे.

थकबाकीमुळे प्रतिवर्षी सहस्रो मराठी शाळांची तोडली जात आहे वीज !

ही स्थिती ‘प्रगत’ महाराष्ट्राला अत्यंत लज्जास्पद ! आमदारांची घरे, गाड्या आणि इतर सुखसोयी यांवर लाखो रुपये उधळणाऱ्या सरकारी यंत्रणा मराठी शाळांना विजेसाठीही निधी देत नाहीत, हे लक्षात घ्या !

आज सानपाडा येथे हिंदु वस्तीत मशिदीच्या बांधकामाला दिलेली अनुमती रहित करण्यासाठी हिंदूंकडून उपोषण !

हिंदूबहुल देशात हिंदूंना आंदोलन करून त्यांची न्याय मागणी का करावी लागते ? प्रशासन स्वतःहून याविषयी पावले का उचलत नाही ?

विद्यापिठे आणि महाविद्यालये प्रत्यक्ष चालू करण्यास राज्यशासनाची मान्यता ! – उदय सामंत, उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री

उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाच्या अंतर्गत येणारी विद्यापिठे आणि महाविद्यालये यांमधील विद्यार्थ्यांचे वर्ग ‘ऑफलाईन’ पद्धतीने चालू करण्यास मान्यता देण्यात आली आहे.