विद्यापिठे आणि महाविद्यालये प्रत्यक्ष चालू करण्यास राज्यशासनाची मान्यता ! – उदय सामंत, उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री

मुंबई, ६ एप्रिल (वार्ता.) – उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाच्या अंतर्गत येणारी विद्यापिठे आणि महाविद्यालये यांमधील विद्यार्थ्यांचे वर्ग ‘ऑफलाईन’ पद्धतीने चालू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. कोरोनावरील प्रतिबंधात्मक २ डोस न घेतलेल्या विद्यार्थ्यांना मात्र यामध्ये ‘ऑनलाईन’ सहभागी होण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, अशी माहिती ६ एप्रिल या दिवशी उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी ‘ट्वीट’द्वारे दिली आहे.