युवकांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्यातील गुण आपल्यात बाणवण्याचा प्रयत्न करावा ! – आदित्य शास्त्री, हिंदु जनजागृती समिती

दानोळी गावातील धर्मप्रेमीनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलीदान मासाच्या निमित्ताने १४ मार्च २०२२ या दिवशी गावातील लोकांना विषय सांगण्यासाठी समितीच्या कार्यकर्त्यांना निमंत्रण दिले होते.

असे राजकीय पक्ष राष्ट्रघातकीच होत !

तेलंगाणाच्या बोधन शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा स्थापन करण्यात आल्यावरून तेलंगाणा राष्ट्र समिती आणि एम्.आय.एम्. यांनी हिंसाचार केला. यामुळे येथे जमावबंदी लागू करण्यात आली.

रंगपंचमीच्या वेळी वापरण्यात येणार्‍या हानीकारक रंगांपासून शरिराचे रक्षण होण्यासाठी सूचना

लोक रंगपंचमीचा खेळ भर उन्हात उघड्यावर खेळतात. सूर्याच्या उष्णतेमुळेही त्वचेवर विपरीत परिणाम होतो. भर उन्हात हानीकारक अतीनील (अल्ट्राव्हायोलेट) किरणांच्या समवेत आर्द्रता अल्प असल्यामुळे त्वचेचा रंग काळपट होतो.

जपानच्या पंतप्रधानांची भारत भेट देशाच्या प्रगतीसाठी लाभदायक ठरेल !

‘जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा सध्या भारत दौर्‍यावर आले आहेत. कोरोनाचा काळ निवळल्यानंतर एका मोठ्या राष्ट्रप्रमुखाने भारताला दिलेली ही पहिली भेट आहे. जपानच्या पंतप्रधानांसाठीही ही भेट महत्त्वाची आहे.

दुर्लक्षित असलेल्या संजीवनी बेटावरील अमूल्य ठेव्याचे इतिहासाच्या दृष्टीने संशोधन होणे आवश्यक !

भारतामध्ये असणार्‍या ऐतिहासिक आणि जीवनोपयोगी अमूल्य ठेव्याकडे दुर्लक्ष करणारा पुरातत्व विभाग काय कामाचा ? असा विचार कुणाच्या मनात आल्यास चूक ते काय ?

रंग खेळतांना योग्य ती काळजी न घेतल्यास होऊ शकते मोठी हानी !

आधुनिक वैद्य (डॉक्टर) लोकांना रंग खेळण्यासाठी केवळ नैसर्गिक (ऑर्गेनिक) रंगांचा उपयोग करण्यास सांगतात. रंगपंचमी खेळतांनाही त्यांनी हेच सांगितले आहे. बाजारात रासायनिक (केमिकल) आणि नैसर्गिक दोन्ही प्रकारचे रंग उपलब्ध असतात….

अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने प्रबोधनासाठी हस्तपत्रक उपलब्ध !

‘सनातन संस्थे’च्या वतीने अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने प्रबोधनासाठी ‘ए ५’ आकारातील पाठपोट हस्तपत्रक नेहमीच्या ठिकाणावर उपलब्ध करण्यात आले आहे.

नम्र, प्रेमळ आणि सतत हसतमुख असलेल्या कल्याण, जिल्हा ठाणे येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. अर्चना अर्गेकर (वय ६३ वर्षे) !

सौ. अर्चना अर्गेकर नेहमी हसतमुख असतात आणि नम्रतेने बोलतात. त्यांच्या तोंडवळ्यावर कधी कुठल्याही गोष्टींचा ताण जाणवत नाही. ‘सर्वकाही देवच करून घेणार आहे’, अशी त्यांची दृढ श्रद्धा असते.

संतांची आध्यात्मिक नाती !

‘संत हे पत्नी, मुले इत्यादी मायेतील नात्यांशी जोडलेले नसतात, तर ते गुरु, गुरुबंधू, शिष्य यांसारख्या आध्यात्मिक स्तरावरील नात्यांशी जोडलेले असतात.’ – परात्पर गुरु डॉ. आठवले

अमरावती येथील सनातनचे ४२ वे संत पू. अशोक पात्रीकर (वय ७२ वर्षे) यांचा साधनाप्रवास !

२० मार्च २०२२ या दिवशी सनातनचे ४२ वे संत पू. अशोक पात्रीकर यांचा वाढदिवस झाला. त्यानिमित्त त्यांचा साधनाप्रवास आपण पहात आहोत. २१ मार्च २०२२ या दिवशी आपण त्यांचा संस्थेशी झालेला संपर्क आणि त्यांनी केलेला साधनेला आरंभ हा भाग पाहिला. आज उर्वरित भाग पाहू.