मराठा आरक्षणावर सरकारने निवेदन करावे ! –  दीपक चव्हाण, तालिका पीठासीन अधिकारी

मराठा आरक्षणप्रश्नी राज्य सरकारने विधानसभेत निवेदन करून भूमिका स्पष्ट करावी, असे निर्देश तालिका पीठासीन अधिकारी दीपक चव्हाण यांनी २१ मार्च या दिवशी विधानसभेत दिले. भाजपचे सदस्य चंद्रकांत पाटील यांनी शून्य प्रहरात हा विषय उपस्थित केला.

प्रवीण चव्हाण यांच्या विरोधात तक्रार प्रविष्ट !

देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनात स्टिंग ऑपरेशनचा पेनड्राईव्ह सादर केला होता. तेव्हा माजी सरकारी अधिवक्ता प्रवीण चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप केले होते.

दुधाला किमान आधारभूत मूल्याचा निर्णय घेण्यासाठी मंत्रीमंडळाची उपसमिती स्थापन करण्यात येईल ! – सुनील केदार, दुग्धविकासमंत्री

‘राज्यातील दुग्ध व्यवसायापैकी ६० टक्के दुग्ध व्यवसाय खासगी, तर ३५ टक्के सहकार क्षेत्राकडे आहे. उर्वरित केवळ ५ टक्के दुग्ध व्यवसाय शेतकरी करतात. कोरोनाच्या काळात अतिरिक्त दुधाची भुकटी करण्यात आली.

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क घेणार्‍या महाविद्यालयांवर फौजदारी कारवाई करू ! – विजय वडेट्टीवार, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री

राज्यातील महाविद्यालयांनी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून शैक्षणिक शुल्क आकारले होते; मात्र ‘महाडीबीटी पोर्टल’द्वारे प्रलंबित मँट्रिकोत्तर शिष्यवृत्ती मान्य झाल्यानंतर महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क परत केले नाही.

‘पंतप्रधान किसान योजने’च्या प्रभावी कार्यवाहीसाठी महसूल आणि कृषी विभागांद्वारे येत्या २५ मार्चपासून ५ दिवस राज्यभर विशेष मोहीम !

राज्यातील पंतप्रधान किसान योजनेमध्ये महसूल आणि कृषी विभागांच्या वतीने येत्या २५ मार्चपासून ५ दिवस राज्यभर ‘विशेष मोहीम’ हाती घेऊन योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी तांत्रिक त्रुटींची पूर्तता करण्यात येणार आहे.

वस्तू आणि सेवा कराच्या संदर्भातील अभय योजनेविषयीचे विधेयक संमत !

या विधेयकामुळे २ ते ३ लाख व्यापार्‍यांना अभय योजनेचा लाभ मिळणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचे सुराज्य पुन्हा आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करू ! – राज ठाकरे, मनसे अध्यक्ष

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले सुराज्य पुन्हा आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करू, अशी शपथ मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दादर येथील कार्यक्रमात घेतली.

पुष्करसिंह धामी हेच होणार उत्तराखंडचे मुख्यमंत्री !

केंद्रीय निरीक्षक आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी येथे घेण्यात आलेल्या विजयी आमदारांच्या एका बैठकीमध्ये ही घोषणा केली.

नरसंहाराचा इतिहास !

एखाद्या विषयावरील चित्रपट अधिक प्रसिद्ध झाला, तर लागोपाठ त्याच पठडीतील चित्रपट काढण्याची स्पर्धा निर्माते आणि दिग्दर्शक यांच्यामध्ये लागते. त्यांच्यामध्ये देशातील वरील नरसंहारांविषयी चित्रपट काढण्याची चढाओढ लागली आणि त्यामुळे देशातील हिंदूंना खरा इतिहास पहायला मिळाला. त्यातून त्यांच्यात जागृती झाली, तर ती हिंदु धर्माच्या रक्षणासाठीचे मोठे यश मानावे लागेल !

चौथी लाट !

कोरोनाच्या काळात नागरिकांनी रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी प्रयत्न केले होते. याच प्रयत्नांमध्ये त्यांनी सातत्य ठेवले पाहिजे. केवळ कोरोनाच नव्हे, तर कोणताही आजार होऊ नये, यासाठी प्रयत्न करणे आवश्यक ठरते. व्यक्ती, समाज आणि देश हे तिघे आजारी असतील, तर ते कधीही प्रगती करू शकत नाहीत, हे प्रत्येक भारतियाने लक्षात ठेवले पाहिजे !