रंगपंचमीच्या वेळी वापरण्यात येणार्‍या हानीकारक रंगांपासून शरिराचे रक्षण होण्यासाठी सूचना

१. रंग खेळण्यापूर्वी घ्यावयाची दक्षता

अ. लोक रंगपंचमीचा खेळ भर उन्हात उघड्यावर खेळतात. सूर्याच्या उष्णतेमुळेही त्वचेवर विपरीत परिणाम होतो. भर उन्हात हानीकारक अतीनील (अल्ट्राव्हायोलेट) किरणांच्या समवेत आर्द्रता अल्प असल्यामुळे त्वचेचा रंग काळपट होतो.

आ. रंग खेळण्याच्या २० मिनिटे आधी हाता-पायाच्या त्वचेला ‘सनस्क्रीन’सारखे मलम लावावे. जर आपल्या त्वचेवर फोड, पुरळ इत्यादी आले असतील, तर ‘सनस्क्रीन’ अधिक प्रमाणात लावले पाहिजे. उन्हापासून त्वचेचे रक्षण होण्यासाठी लावायच्या मलमामध्ये अधिक ओलसरपणा असतो. जर आपली त्वचा अधिक कोरडी असेल, तर ‘सनस्क्रीन’ लावल्यानंतर थोडा वेळ थांबावे आणि नंतर त्वचेवर ‘मॉइश्चराइजर’चा लेप लावावा. हातांवर आणि शरिराच्या सर्व उघड्या भागांवर ‘मॉइश्चराइजर लोशन’ किंवा मलमचा उपयोग करावा.

इ. रंग खेळण्यापूर्वी केसांना ‘हेअर सीरम किंवा कंडिशनर’ लावावे. त्यामुळे केसांना गुलाल लागल्यामुळे येणार्‍या कोरडेपणापासून संरक्षण लाभेल आणि सूर्यकिरणांमुळे होणार्‍या हानीपासूनही रक्षण होईल. आपण शुद्ध खोबरेलतेल सुद्धा केसांना लावू शकतो. यामुळे रासायनिक रंगांपासून केसांची होणारी हानी थांबवू शकतो.

ई. रंग खेळतांना जेवढी मजा रंग लावतांना येते, तेवढाच त्रास खेळ संपल्यावर रंग काढतांना होतो. उधळणार्‍या रंगांमध्ये अभ्रक, शिसे इत्यादींसारखे हानीकारक रासायनिक पदार्थ मिसळलेले असतात. त्यामुळे त्वचा कोरडी आणि निर्जीव होते, केस गळतात आणि त्वचेची जळजळ होऊ लागते.

उ. त्वचेचा रंग काळपट होतो. रंग खेळल्यानंतर त्वचा निर्जीव बनते.

. रंगामुळे नखांची होणारी हानी थांबवण्यासाठी नखांवर ‘नेल वॉर्निश’ चोळावे.

२. रंग खेळल्यानंतर घ्यावयाची दक्षता

अ. रंग खेळल्यानंतर त्वचा आणि केस यांवर लागलेले रंग काढणे पुष्कळ कठीण असते. त्यासाठी सर्वांत प्रथम आपले तोंड पुनःपुन्हा स्वच्छ पाण्याने धुवावे आणि त्यानंतर ‘क्लिजिंग क्रिम किंवा लोशन’चा लेप लावावा अन् थोड्या वेळानंतर ओल्या मऊ कापडाने हळूवारपणे पुसावे.

आ. डोळ्यांच्या आसपासचा भाग हळूवारपणे स्वच्छ करण्यास विसरू नये. ‘क्लिनिंग जेल’मुळे तोंडावर लागलेला रंग धुऊन टाकण्यास पुष्कळ साहाय्य होते.

इ. शरिरावरील रासायनिक रंग काढण्यासाठी तिळाच्या तेलाने शरीर मर्दन करणे महत्त्वाचे असते. त्यामुळे रासायनिक रंग निघून जातात आणि त्वचेचे संरक्षणही होते.

ई. केसांमध्ये पडलेले कोरडे रंग आणि अभ्रक यांना काढण्यासाठी केसांना पुनःपुन्हा साध्या पाण्याने धुवत रहावे. त्यानंतर केसांना वनस्पती (हर्बल) शॅम्पू संपूर्ण डोक्यावर पसरावा. तो पूर्णपणे लावल्यानंतर पाण्याने चांगल्या प्रकारे धुवावे.

उ. रंग खेळल्यावर २ दिवसांनी २ चमचे मध अर्धा कप दह्यात मिसळावे. त्यात थोडीशी हळद मिसळावी आणि हे मिश्रण तोंड, हात आणि सर्व उघड्या अंगावर लावावे. हा लेप २० मिनिटे लावून ठेवावा आणि त्यानंतर ताज्या पाण्याने स्वच्छ धुवावे. यामुळे त्वचेवरील काळपटपणा निघून जाईल आणि त्वचा मऊ होईल.

ऊ. रंग खेळल्यानंतर पुढील काही दिवस ‘आपली त्वचा आणि केस यांचे पोषण होईल’, असे पदार्थ वापरावेत.

– हेमा गिरि (साभार : मासिक ‘अक्षय प्रभात’, मार्च २०१९)