पुण्यात सनबर्न होळीच्या पार्टीत तरुण-तरुणींचे मद्यप्राशन करून बेधुंद नृत्य !

  • होळी साजरी करतांना मद्यपान आणि बिभत्स वर्तन केल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचे राज्यशासनाने नियमावलीमध्ये घोषित केले असतांना, तसेच ‘डीजे’ लावण्यास बंदी असतांना या नियमांचे उल्लंघन करून ‘सनबर्न’सारख्या कार्यक्रमांना अनुमती कशी देण्यात आली ? हा कार्यक्रम होणार असल्याचा मोठ्या प्रमाणात प्रचार होत असतांना कुणीच कसा आक्षेप घेतला नाही ? – संपादक
  • देशाच्या युवा पिढीला व्यसनाधीन बनवणार्‍या आणि हिंदूंच्या सणांचे पावित्र्य भंग करणार्‍या ‘सनबर्न’ आणि अशा प्रकारच्या महोत्सवांचे आयोजन करणार्‍यांना कुणाचा पाठिंबा आहे, हेही पुढे आले पाहिजे ! – संपादक
  • समाजाची अतोनात हानी करणार्‍या अशा महोत्सवांच्या विरोधात हिंदूंनी संघटितपणे जागृती केली पाहिजे ! – संपादक
प्रतिकात्मक छायाचित्र

हडपसर (जिल्हा पुणे)- होळी आणि धूलिवंदन यांच्या निमित्ताने हडपसर परिसरातील ‘अमनोरा’ मॉलमध्ये खासगी इव्हेंट आस्थापनाकडून ‘सनबर्न होळी महोत्सव’ या नावाखाली सनबर्न होळी पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. मोठ्या प्रमाणात विज्ञापन करून या कार्यक्रमाची साडेतीन सहस्र रुपयांपर्यंत तिकीट विक्री करण्यात आली होती. उच्चभ्रू तरुण-तरुणी या कार्यक्रमात सहभागी झाले होते. यासाठी उच्च क्षमतेची ध्वनीवर्धक यंत्रणा वापरण्यात आली होती. या पार्टीत मद्यप्राशन करून बेधुंद नृत्य करणार्‍या तरुणांकडील भ्रमणभाष मोठ्या प्रमाणात चोरले गेल्याचे समोर आले आहे.

या प्रकरणी आतापर्यंत २१ तक्रारी प्रविष्ट झाल्या आहेत. मात्र भ्रमणभाष चोरीचा आकडा ८० ते ९० च्या घरात असण्याची शक्यता आहे. एका संशयितालाही पोलिसांनी कह्यात घेतले आहे. या प्रकरणी चोरांवर गुन्हा नोंद करण्यात येणार असल्याची माहिती हडपसर पोलिसांनी दिली.