खोटी देयके देऊन शासनाची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणार्‍यांना अटक

खोटी देयके देऊन फसवणूक करणार्‍या व्यापार्‍यांना कठोर शिक्षा हवी ! – संपादक

राज्य वस्तू आणि सेवाकर विभाग

मुंबई – खोटी देयके देऊन शासनाची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी राज्य वस्तू आणि सेवाकर विभागाने (जी.एस्.टी.) हिरालाल जैन आणि प्रमोद कातरनवरे या व्यापार्‍यांना अटक केली. शासनाचा महसूल बुडवणार्‍यांच्या विरोधात वस्तू आणि सेवाकर विभागाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. ‘टेस्को इम्पेक्स’चे मालक कातरनवरे आणि ‘पारसमणी ट्रेडर्स’ या आस्थापनाचे मालक गणेश काकड हे व्यवसाय करत नाहीत. त्यांनी वस्तूंच्या पुरावठ्याविना शासनाला १९७ कोटी रुपयांची बनावट देयके दिल्याचे उघड झाले. २९ कोटी रुपयांच्या वस्तू आणि सेवाकर त्यांच्या प्राप्तकर्त्यांना स्थानांतरित करून २९ कोटी रुपयांची बनावट वजावट मिळवून दिली. त्यांनी कोणत्याही वस्तूंचा पुरवठा न करता देयके सिद्ध करून शासनाची हानी केली आहे. आरोपींना २८ मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.