
मुंबई – शिवसेनेचे नेते यशवंत जाधव आणि त्यांच्या आमदार पत्नी यामिनी जाधव यांनी मुंबईत ३६ इमारती विकत घेतल्या असून त्यांचे मूल्य १ सहस्र कोटी रुपये असल्याचा दावा भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. शिवसेना नेते यशवंत जाधव आणि आमदार यामिनी जाधव यांनी २ वर्र्षांत मुंबईत घर, दुकान, गाळे असलेल्या ३६ इमारती (जुन्या पघडीचा इमारती) विकत घेतल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे.
या प्रकरणी यशवंत जाधव यांची ईडी, कंपनी मंत्रालय, आयकर विभागाकडून पडताळणी चालू असून काही दिवसांत कारवाईची अपेक्षा असल्याचे मत सोमय्या यांनी व्यक्त केले आहे. यशवंत जाधव यांच्याकडे एवढी संपत्ती असेल, तर त्यांच्या नेत्यांकडे किती संपत्ती असेल ?, असा प्रश्नही सोमय्या यांनी उपस्थित केला.
गोव्यातील धरणांतील जलसाठ्यात लक्षणीय वाढ
अंमलबजावणी संचालनालयाच्या अनेक राज्यांमध्ये एकाच वेळी धाडी
उच्च न्यायालयाच्या कडक भूमिकेनंतर मोरजी किनारपट्टीवरील २३ अनधिकृत बांधकामे पाडली
जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखीचे नेत्रदीपक रिंगण !
आज मराठी शाळांसाठी मराठी अभ्यास केंद्राची बैठक !
नगरसेवक रमेश म्हात्रे यांना ३ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी !