मुंबई – दिंडोशी पोलिसांनी २ जणांना अटक करून त्यांच्याकडून १ कोटी ३० लाख रुपये किमतीचे अमली पदार्थ कह्यात घेतले आहेत. गौरव कुमार प्रसाद आणि कृष्ण कुमार पंडित अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
बिहारमधून २ जण मुंबईत अमली पदार्थ पुरवण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी मालाडच्या संतोषनगर भागातून सापळा रचून या दोघांना अटक केली. या आरोपींकडून ३ किलोपेक्षा अधिक चरस मिळाले आहे. हे चरस ते चित्रपट कलाकारांना विकणार असल्याचे समजते.